पदभार स्विकारताच जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : श्री.अविशांत पांडा यांची गडचिरोलीचे नवीन जिल्हाधिकारी म्हणुन नियुक्ती झाली असून त्यांनी २६ डिसेंबरला संजय दैने यांच्याकडून पदभार स्वीकारला.

नवनियुक्त जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी  जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याकरिता जिल्च्याह्यातील  विभागप्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यात विकास कामी करण्सायाकरिता मोठा वाव असून मिळालेली  कामे करण्यासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग  करून प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढणे आणि भविष्यातील योजनांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

मावळते जिल्हाधिकारी संजय दैने यांच्यासह अपर जिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ राजेंद्र भुयार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी नवनियुक्त जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर संजय दैने यांची वस्त्रोद्योग आयुक्त, नागपूर येथे बदली झाली आहे.नवनियुक्त जिल्हाधिकारी   यानी सर्व अधिकाऱ्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. असून  त्यांनी जिल्ह्यातील महत्त्वाचे विषय व प्रश्न संजय दैने यांच्याकडून समजून  घेतले.

हे ही वाचा,

 

स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील 64 गावांमध्ये आज सनद वाटप

आर्थिक सुधारणांचे जनक व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

सीसीआयकडून खरेदी केंद्र मंजूर : हमी भावाने कापूस विकण्याचा मार्ग मोकळा !

 

नवनियुक्त जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी  जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याकरिता जिल्च्याह्यातील  विभागप्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत.