विविध क्रीडा प्रबोधिनीत खेळाडूंना प्रवेशाची संधी

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क 

गडचिरोली,दि.28- आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व पुणे स्थित शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत.
चालू शैक्षणिक वर्षासाठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, गडचिरोली क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशासाठी दि. 15 ते 16 जुलै दरम्यान 50 टक्के व कौशल्य चाचणी 50 टक्के प्रक्रीयेंतर्गत निकषानुसार निवासी व अनिवासी प्रवेश प्रक्रीयेसाठी सरळ प्रवेश प्रक्रीयेनुसार क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो.
खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निच्छित केला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातून इच्छुक असलेल्या व पात्र असलेल्या खेळाडूंनी दि. 05 जूलै, 2024 पर्यंत मुळ क्रीडा प्रमाणपत्रासह येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी नाजुक उईके, राज्य क्रीडा मार्गदर्शक (9049339966) व एस.बी. बडकेलवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक (9503331133) यांच्याशी संपर्क साधाण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले .

Comments (0)
Add Comment