चंद्रपूर जिल्हा कारागृहात आरोपीची गळफास घेवून आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि २६ डिसेंबर : चंद्रपूर जिल्हा कारागृहात आरोपीने गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अंकित रामटेके असं आत्महत्या करणाऱ्या कच्च्या कैद्याचे नाव आहे. जुलै २०२० मध्ये दुर्गापूर येथे अनिकेत रामटेके या आपल्या लहान भावाचा खून केल्याच्या आरोपात अंकित रामटेके याला अटक झाली होती. आज सकाळी त्याचे शरीर गळफास लावलेल्या अवस्थेत आढळल्याने कारागृहात एकच पळापळ झाली.

दरम्यान घटनेची माहिती न्याय विभागाला दिली गेली. पोलीस पथक-कारागृह अधिकारी, न्यायदंडाधिकारी यांच्या हजेरीत पंचनामा करण्यात आला असून ही घटना नेमकी कशी घडली, त्यावेळेस बंदोबस्तावर असलेले कर्मचारी काय करत होते, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे