लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली 9 फेब्रुवारी :- गडचिरोली शहरातील नामांकित हॉटेल वैभव येथे 28 जानेवारी रोजी असलेल्या कार्यक्रमानिमीत्त फिर्यादी हरीनारायण मंगलप्रसाल पॉल हे त्यांचे परीवार व नातेवाईकांसह हॉटेल वैभव येथे वास्तव्यास असतांना रात्रीदरम्यान एका अनोळखी इसमाने दर्शनी भागात असलेल्या खिडकीतून प्रवेश करुन फिर्यादी व त्यांचा परीवार गाढ झोपेत असल्याची संधी साधुन फिर्यादीचे दोन मोबाईल व दोन सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र असा एकूण ३,८५,०००/- रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखा च पोलीस स्टेशन गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निर्देशीत करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्यात. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व पोलीस स्टेशन गडचिरोली यांनी त्यांची पथके तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
स्थानिक गुन्हे शाखा येथे मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पोलीस उपनिरीक्षक दिपक कुंभारे व त्यांचे पथकाने करण बुधाजी मरलावार रा. चांदली ता. सावली जि. चंद्रपूर यांस माडेतुकुम परीसरातून ताब्यात घेवून गुन्ह्यासंदर्भात सखोल विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देवून त्याने गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल काढुन दिला. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली.
हे पण वाचा :-