संस्कार शिबीराच्या माध्यमातुन व्यक्तीमत्व विकास साध्य करा ; माजी राज्यमंञी राजे अम्ब्रीशराव महाराज

आलापल्ली येथे संस्कार शिबीर व सामुदायीक प्रार्थनेला उसळली गर्दी...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आलापल्ली दि,१६ : वंदणीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामजंयती उत्सव कार्यक्रमा निमित्त मौजा आलापल्ली येथे शनिवार दि, १५/०४/२०२३  ला दुपारी ३:०० वा ते सांयकाळी ६:०० वाजता पर्यंत संस्कार शिबीर व सामुदायीक प्रार्थनेचे कार्यक्रम घेण्यात आले.        या कार्यक्रमाप्रसंगी उद,घाटक माजी राज्यमंञी राजे अम्ब्रीशराव महाराज संभाषनात म्हणाले की,आई,वडील ,गुरु व वडीलधा-या माणसाचे मान राखुन युवक,युवतीनी निर्व्यशनी,चारीञ्यवान ,निष्ठावंत व थोर व्यक्तीमत्वाचे धनिक व्हावे व सदैव सुसंगती साधावी ज्यामुळे एक आदर्श व्यक्तीमत्व घडु शकाल या करीता दुराचारी व दुर्जन प्रव्रुतीकडे वळणा-या व कुसंगती करणा-या प्रत्येक व्यक्तीना सुविचाराने सन्मार्ग दाखविण्याची गरज असुन वारंवार व्यक्तीमत्व विकासा करीता संस्कार शिबीराच्या माध्यमातुन प्रत्येकानी व्यक्तीमत्व विकास साध्य करा.व स्वावलंबी बना असे उदगार माजी राज्यमंञी राजे अम्ब्रीशराव महाराज म्हणाले.

त्यानंतर चंद्रपुर येथील इ्जीनियरींग कालेजच्या प्रा. विशाखा सरणे यांनी युवक,युवती व महीलाना मार्गदर्शनातुन भारावुन सोडलं व  त्यांनी छञपत्ती शिवाजी महाराज,भारतरत्न डाँ .बाबासाहेब आंबेडकर,ऱाजर्षी शाहु महाराज,महात्मा ज्योतीबा फुले,यासह अन्य थोर महात्याचे संस्कार व इत्तिहास सांगीतलं यानंतर मान्यवरांचे संभाषणे झाले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डाँ शिवनाथजी कुंभारे साहेब,मुख्य अतीथी तथा मार्गदर्शक,सिआरप्एफ बटालीयन 9 चे कमान्डैण्ट आफीसर आर एस बालापुरकर,प्राध्यापिका विशाखा सरणे, दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी तथा लोकस्पर्श न्युजचे संपादक ओमप्रकाश  चुनारकर ,प्राचार्य गजानन लोणबले .नि.प्रा पद्मनाभ तुंडुलवार, समाजसेवक विजय खरवडे , संगीत कला शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनपालजी कार,एलआयसी डेव्हलमेन्ट आफीसर मुनेशेवरजी हडपे,सेनि.प्रा.पंडीतजी पुडके,सेनि.प्रा.भास्करजी नरुले,जेंगठे दादा, सामाजीक कार्यकर्ते व्यंकटेशजी मदेर्लावार,से.नि.सहाय्यक वन संरक्षक मोहनजी मदने,नाणाजी ठाकरे,ज्ञानेश्वर दुर्गे,संतोष मल्यालवार,पुनम बुध्दावार,जयप्रकाशजी शेन्डे,माजी नगराध्यक्षा हर्षाताई ठाकरे,ज्योतीताई कोमलवार,जयश्री नालमवार,सौ.गादेवारताई,सौ.बुरांडेताई,सौ.पल्लवीताई शेट्ये,सौ.अर्चनाताई तलांडे,सौ.दुर्गमताई,सौ.सुप्रीयाताई गेडाम,स्वराज्य फाऊँडेशनचे अध्यक्ष सागर रामगोणवार ,आदर्श केसनवार,सौ.दमयंती राजुरकर,सुप्रीयाताई बुध्दावार,सौ.कोमलताई कामठे,सौ.वर्षाताई पेंपकवार,सौ.मनिषाताई तुंडुलवार,शारदाताई कन्नाके,विमलताई धुळसे, सोनाली भट्ट,प्रतिक्षा येवले,संस्कुती घोडसेलवार,विजय चरडुके,शरद पोलोजवार,अनिकेत निमलवार,वैभव कोमलवार,रोशन घोडसेलवार,नथ्थुजी चिमुरकर ,अनुराग तुंडुलवार,अनिकेत खरवडे,नरेश बोम्मावार,कुणाल वर्धलवार,शिवम मुप्पीडवार,संजय खरवडे,शंकर येरमे,चरणदासजी बोरकुटे,झरकरजी मसेली,यासह मोठ्या संख्येने महीला,पुरुष व युवक,युवती उपस्थीत होते.कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता स्वराज्य फाऊँडेशन,नारीशक्ती संघटना,सखी मंच,महीला भजन मंडळ,,आलापल्लीचा लाडकाराजा गणेश मंडळ,व विविध सामाजीक संघटनेनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुञ संचालन रविन्द्र ठाकरे यांनी तर प्रास्तावीक से.नि. प्रा.पद्मनाभ तुंडूलवार यानी केले व आभार से.नि.सहाय्यक वनसंरक्षक मोहनजी मदने यानी मानले.कार्यक्रमा नंतर सर्वाना महाप्रसादाचे आयोजन केलेले होते.

 

gadchirolicolectorspnilotapal