शहरातील तंबाखू विक्रेत्यांवर होणार कारवाई

आरमोरी येथील तालुका समितीच्या बैठकीत चर्चा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

आरमोरी, 26 ऑक्टोंबर : आरमोरी तहसील कार्यालयात दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत मुक्तीपथ तालुका समितीची बैठक तहसीलदार  श्रीहरी माने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर सभेमध्ये शहरातील व ग्रामीण भागातील सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी शहरातील वॉर्डांमध्ये व ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्यांवर पोलीस विभागाने कारवाई करून दारू विक्री बंद करावी, ग्रामपंचायतस्तरीय समित्या सक्रिय करणे, प्रत्येक शाळेने ११ निकषांचे पालन करून शाळा दारू व तंबाखूमुक्त कराव्या, पथक नेमून शहरात वार्डात राऊंड घेऊन दंड वसूल करण्यात यावा, यासह विविध दहा विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
 सभेला तालुका समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार श्रीहरी माने, पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, टीएचओ कार्यालय प्रतिनिधी ए.आर. पठाण, बीडीओ यांचे प्रतिनिधी मनोज मडावी, बीईओ यांचे प्रतिनिधी राजेश वडपल्लीवार, उमेदचे विनोद बोबाटे, प्रतीक माथनकर, राजू कांबळे, वनपाल सुधीर धात्रक, फुलझेले, अल्का मेश्राम, दौलत धोटे, शहर संघटन प्रतिनिधी चंदा राऊत, विनोद कोहपरे, मुक्तिपथ तालुका संघटक विनोद कोहापरे, तालुका प्रेरक स्वीटी आकरे, स्पार्क कार्यकर्ती दीक्षा तेलकापल्लीवार आदी उपस्थित होते.
https://youtu.be/RPFga-PzVg0