आदर्श ग्रामपंचायतीला अस्वच्छतेचं ग्रहण

ग्रामपंचायत विसापूर येथील प्रकार ; सरपंच उप-सरपंचाचे जेरबंद झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

बल्लारपूर, 17 मे – शहराला लगत असलेली तालुक्यातील आदर्श गाव पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीला हल्ली अस्वच्छतेचा किळस लागल्याचे कथन विसापूरवासी करीत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून गावासह वार्ड नं. ५ मध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. मात्र, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित कामामुळे विकासकामाला ग्रहण लागले आहे. ग्रामपंचायतीने तत्काळ गावाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे अशी मागणी गावकरी करीत आहे.

विसापूर ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असल्याने या ग्रामपंचायतीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून गावासह वार्ड नं. ५ मध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे साकारण्यात आली. मात्र, वार्डात ठिकठिकाणी नालीचे उघडे चेंबर, रस्त्यालगत वाढलेली काटेरी झुडपे अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. गावातील या विद्रूप दृष्यामुळे पालकमंत्र्यांच्या विकासाला कुठेतरी कुठेतरी खीळ बसत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.

गावकऱ्यांनी वार्ड नं- ५ मधून मोठ्या मताधिक्याने तत्कालीन उपसरपंच अनकेश्वर मेश्राम यांना निवडून दिले. मात्र, अश्या जबाबदार पदी असणाऱ्या व्यक्तीकडूनच गावाच्या विकासाला खीळ बसत असल्याचा आरोप गावकरी करीत आहे. विशेष बाब म्हणजे, गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी विसापूर ग्रामपंचायतीचे एक शिष्टमंडळ राळेगणसिध्दि प्रसिद्ध समाजसेवी अण्णा हजारे यांच्या गावाला भेट देऊन अभ्यास दौरा पुर्ण केला. परंतु, गावातील विद्रूप दृश्य पाहता या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने निव्वळ पर्यटन घडवून आणल्याचा आरोप गावकरी करीत आहे. हा रस्ता त्वरित काटेरी मुक्त होईल याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.