लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सिरोंचा 19 सप्टेंबर :- गडचिरोली जिल्हयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पोलीस भरतीसाठी दिनांक २ मार्च २०२० च्या शासन निर्णयाप्रमाणे एनसीसी प्रमाणपत्राचे ५ टक्के वाढीव गुण हे अन्यायकारक असून ते तात्काळ बंद करावेत अशी मागणी सिरोंचा येथील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विध्यार्थानी सिरोंचा तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन केली आहे.
या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनाही देण्यात आली आहे.
राज्यात पोलीस भरतीची जोरदार तयारी युवक करीत असताना या विद्यार्थ्यांना गडचिरोली जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेत शासन निर्णय २ मार्च २०२० च्या प्रमाणे एनसीसीच्या विद्यार्थ्यांना ५ टक्के गुण वाढवून देत असल्याचे निदर्शनास आले , हा इतर विध्यार्थावर अन्याय आहे हे लक्षात आले, एनसीसी विध्यार्थाना भरती प्रक्रियेत ५ टक्के जागा राखून ठेवणे योग्य आहे पण इतर विध्यार्थाबरोबर ५ टक्के अधिक गुण देणे अन्यायकारक आहे.असे इतर विध्यार्थाचे मत आहे. ही अन्यायकारक प्रक्रिया रोखावी यासाठी मुख्यमंत्र्यांना हे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना सिरोंचा येथील पोलीस भरतीतील युवकांनी हे निवेदन दिले.
हे देखील वाचा :-