आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेला खिंडार

वरळीमधून मोठी बातमी समोर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. २ ऑक्टोंबर वरळीतून मोठी बातमी येत आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वरळीमध्ये मोठा धक्का बसला आहे.

वरळीमधील शेकडो शिवसैनिकांनी  शिंदे गटात प्रवेश केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे शिवसैनिक वरळी कोळीवाडा परिसरातील आहेत.

वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्याच मतदारसंघातील शेकडो शिवसैनिकांनी आज शिंदे गटात प्रवेश केल्याने हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ऐन दसरा मेळाव्याच्या तोडांवर शेकडो शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले आहेत.

यापूर्वी देखील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उठवानंतर शिवसेनेत सुरू झालेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापुढे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न देखील होत आहेत. मात्र अद्याप तरी यश येताना दिसून येत नाहीये.

हे देखील वाचा : 

सामनातून शिंदे गटाला रोखठोक उत्तर

 

सोशल मीडियातून मनोरुग्ण महिलेला ठरवले चोर,अफवांमुळे पोलिसांची वाढली डोकेदुखी

महात्मा गांधींचे नेतृत्व देशाच्या सीमा तोडून पसरत गेले. – राज ठाकरे

 

Aditya Thakredevendra fadnavisEknath Shindelead newsuddhav Thakre