विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाड यांची भेट घेऊन अहेरीचे आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी मांडल्या जिल्ह्याच्या प्रलंबित समस्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १९ फेब्रुवारी:- आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी विधिमंडळाचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाड यांची गुरुवार 18 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या कार्यालयात भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील  विकासात्मक कामांचे निवेदन देऊन जिल्ह्याच्या प्रलंबित समस्याविषयी सविस्तर चर्चा केली व जिल्ह्यातील समस्यांचे अवलोकन करून दिले.

जिल्ह्यातील  रेंगाळत असलेली कामे मार्गी लावण्यासंदर्भात व अन्य नाविन्यपूर्ण विकासात्मक कामांसाठी निधीची तरतूद करण्यासंदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाड यांच्याकडे विषय लावून धरले. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्हा व मुख्यतः अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्र शेवटच्या टोकावर असल्याने या भागाच्या सर्वांगीण विकास व्हावे यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाड यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यासोबत म्हणत सकारात्मक चर्चा करून जिल्ह्यातील विविध विकासात्मक व रेंगाळत असलेल्या कामांकडे लक्ष घालून कामांच्या निवेदनाचे निराकरण करणार असल्याचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाड यांनी यावेळी आ. धर्मराव बाबा आत्राम यांना आश्वासन दिले.   

Dharmaraobaba Atram