‘अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण..,राऊतांचा मोठा खुलासा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, 13 जून :- एकीकडे भाजपचे  नेते महाविकास आघाडी सरकार कधी पडणार याचे आखाडे बांधत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी  आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला असून त्यावर वाद होईल आणि सरकार पडेल, अशी चर्चा रंगली आहे. पण, ‘असे जे पसरवले जात आहे त्यात काहीच तथ्य नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हा ‘पाच’ वर्षांसाठी दिलेला शब्द आहे’ असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीबद्दल खुलासा केला आहे. तसंच शिवसेनेकडेच पाच वर्ष मुख्यमंत्रिपद राहणार आहे, असं ठामपणे सांगितलं आहे.

अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दावा सांगितला जाईल व तेथे आघाडीत वादाची ठिणगी पडेल. त्या वादातून राज्यात नव्या राजकीय घडामोडींना वेग येईल, असे जे पसरवले जात आहे त्यात काहीच तथ्य नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हा ‘पाच’ वर्षांसाठी दिलेला शब्द आहे’ असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

‘देवेंद्र फडणवीस सांगतात, ठाकरे यांचे सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. त्याच वेळी चंद्रकांत पाटील ठामपणे सांगतात, महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल. कोणाला कळणार नाही. भाजपचे धोरण स्पष्ट दिसत नाही. सरकारचे काय करायचे ते फडणवीस व पाटील यांनी एकाच टेबलावर बसून काय ते ठरवायला हवे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यापैकी एक पक्ष बाहेर पडल्याशिवाय सरकार पडणार नाही हे अमित शहा यांनी एकदा स्पष्ट केले. परिस्थिती अद्यापि तीच आहे’ असा टोला राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला.

ajit pawarcongressmaha cmmaha govtpawaruddhav