पुनः वाघांच्या हल्यात महिला ठार, वनाधिकारी मानव – वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाय योजना करतील ?

गडचिरोलीच्या वाकडी जंगलातील दुपारच्या सुमारास घटना..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 03 जानेवारी 2024 – गडचिरोली शहरापासून जवळच असलेल्या वाकडी जंगल परिसरात आज, बुधवारी दुपारच्या सुमारास शेतात आपल्या मुलीसह काही मजूर काम करीत असताना अचानक वाघाने हल्ला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.

मंगलाबाई विठ्ठल बोढे (५२ रा. वाकडी ता.गडचिरोली) असे मृत महिलेचे नाव आहे. शहरापासून जवळच असलेल्या वाकडी जंगल परिसरात मंगलाबाई आपली मुलगी शीतल तीक्षण रोहनकर व अन्य काही महिलांसोबत मुलीच्या समोरच वाघाने शेतालगत असलेल्या वन कक्ष क्रमांक १७१ मध्ये मजूर काम करीत असतानाच वाघाने मंगलाबाई यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यानंतर त्या जोराने ओरडल्या. मुलगी शीतल व इतर महिलांनी बाजूला पड काढला.

मंगलाबाई या वाघाशी झुंज देत होत्या. मात्र, वाघाने त्यांच्या गळ्यावर पंजाने हल्ला केला.शेतालगत असलेल्या वन कक्ष क्रमांक १७१ मध्ये २०० ते २५० मीटर अंतरावर ओढत नेल्याने जागीच मृत्यू. यानंतर मुलगी  शीतलसह इतर महिलांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी तसेच पोलीस अधिकारी घटना स्थळी पोहचले असून मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून अधिक तपास वन अधिकारी करीत आहेत. गडचिरोली जिल्हात दिवसेंदिवस वाघांच्या हल्यात वाढ होत असून स्थानिक गावातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हे पण वाचा :-

भ्रष्टाचाराचे कुरण भाग: ४ ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील अनागोंदी कारभाराविरोधात कारवाईचा केवळ दिखावा…

gadchiroli forestTigerTiger Attackwakadi tiger attackwoman kill by tiger