पुन्हा पाच गावांनी माओवाद्यांच्या केली गावबंदी..

माओवाद्याच्या अस्तित्वला पुनःखिंडार…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 24 जुन – भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोस्टे च्या हद्दीतील पुनः पाच गावांनी माओवाद्यांना गावबंदी केली असल्याने आदिवासी बहुल ग्रामीण भागात मावाद्याप्रती भीती नष्ट होत आहे.तर पोलीस दादा लोरू खिडकीच्या माध्यमातून आदिवासी नागरिकांच्या समस्या तोडून मदत करत असल्याने पोलीस और विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच माओवाद्याना सामान्य नागरिक गाव बंदी करताना दिसत आहेत.

पोलीस विभाग गावकऱ्यांचा मन जिंकल्यानंतर गावकरीही पोलीस विभागाला मदत करीत असतो नुकतेच लाहेरी उप पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुमारे 250 नागरिकांनी पाच भरमार बंदुकांसह 200 ते 300 सलाखी (Spikes) जमा केल्या आहेत तर जवळ असलेल्या पोलीस स्टेशन धोडराज हद्दीतील मौजा नेलगुंडा येथील नागरिकांनी स्वत:हून पोलीस स्टेशन मध्ये कुकरमध्ये ठेवलेल्या आयडी सदृश्य वस्तू व 450 सलाखी (Spikes) केले जमा जात आहे . भामरागड उपविभागात मागील दहा दिवसांत केली 13 गावांनी माओवाद्यांना गावबंदी केल्याने माओवाद्यांना धोका निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र शासन माओवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी विविध योजना राबवित आहे. सन 2003 पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध शासकिय योजनांच्या लाभामुळे यापूर्वी दिनांक 14 जून रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज येथे घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये हद्दीतील परायणार, नेलगुंडा, कुचेर, कवंडे, गोंगवाडा, मिळदापल्ली व महाकापाडी या सात (07) गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानूमते नक्षल गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव प्रभारी अधिकारी पोस्टे धोडराज यांना सादर केला होता. त्यानंतर मौजा भटपार गावक­यांनीही माओवाद्यांना गावबंदी करुन कुकरमध्ये ठेवलेल्या आयडी सदृश वस्तू, वायर, बॅटर व सलाखी (Spikes) पोस्टे धोडराज येथे दिनांक 20 जून रोजी जमा केल्या होत्या. त्यात आणखी एक भर म्हणून गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी व सचिव, जहाल माओवादी, डिकेएसझेडसीएम गिरीधर तुमरेटी याने सहपत्नी ललीता चैतु उसेंडी (डिव्हीसीएम भामरागड दलम) सह दिनांक 22 जून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समोर आत्मसमर्पण केले. त्यामुळे माओवाद्यांचा बालेकिल्ला समजला जाणा­या भामरागड व अबुझमाड जंगल परिसरातच त्यांच्या अस्तित्वाला खिंडार पडले आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, माओवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासन विविध योजना राबवित असते. सन 2003 पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध शासकिय योजनांच्या लाभामुळे आज दिनांक 24 जून रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी हद्दीतील मोरडपार, आलदंडी, कोयर, गोपणार व मुरुंगल या पाच (05) गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानूमते नक्षल गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव प्रभारी अधिकारी उपपोस्टे लाहेरी यांना सादर केला.

वरील पाच ही गावे गडचिरोली जिल्ह्राच्या शेवटच्या टोकावर स्थित असून माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा­या अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ असल्याने या गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते. तसेच गावातील काही सदस्यांचा माओवाद्यांना पाठिंबा होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे येथील नागरिक हे शासनाप्रती उदासीन होते. परंतू मागील तीन वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत विविध जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे इ. च्या माध्यमातून येथील गावक­यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात यशस्वी झाल्याने पोलीस दलाच्या प्रती येथील गावक­यांचा विश्वास दृढ झाला.

यासोबतच माओवाद्यांकडून करण्यात आलेली जाळपोळ व इतर साहित्यांचे केलेले नुकसान, माओवाद्यांकडून पोलीस खब­या असल्याच्या संशयावरुन करण्यात आलेल्या निष्पाप गावक­यांच्या हत्या व मारहाण, नुकसानीच्या विविध घटना, गावांच्या विकास कामात करण्यात येणारा अडथळा, जनतेला दाखविण्यात येणारा धाक इ. घटनांमुळे माओवादी हे जनतेची दिशाभूल करत आहेत हे गावक­यांच्या लक्षात आले. त्याचाच परिपाक म्हणून आज दिनांक 24 जून रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी हद्दीतील वरील पाच (05) गावातील गावक­यांनी हा नक्षल गावबंदी ठराव संमत केला तसेच यापूढे गावामार्फत कोणत्याही माओवादी संघटनेस जेवन/राशन/पाणी देणार नाही, त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही, गावातील नागरिक स्वत: किंवा त्यांच्या मुलाबाळांना माओवादी संघटनेत सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांची ट्रेनिंग करणार नाही, माओवाद्यांच्या मिटींगला जाणार नाही तसेच माओवाद्यांना खोट्या  प्रचारास बळी पडणार नाही असे सांगितले.

यावेळी वरील पाचही गावातील नागरिकांनी माओवाद्यांनी पोलीस पथकाला नुकसान पोहचविण्याच्या उद्देशाने जंगलात लपवून ठेवलेले पाच भरमार बंदूक तसेच जंगलात खड्डे करुन त्यात पुरुन ठेवलेले धारदार लोखंडी 200 ते 300 सलाखे (Spikes) काढून आणून पोलीस दलाकडे सुपूर्द केली. यासोबतच पोस्टे धोडराज हद्दीतील मौजा नेलगुंडा या गावातील नागरिकांनी दिनांक 14 जून रोजी गावात नक्षल गावबंदी केल्याचा ठराव पोस्टे धोडराज येथे सादर केला होता. त्यामुळे आज येथील गावक­यांनी पोस्टे धोडराज हद्दीत सुरक्षा रक्षक दलांना नूकसान पोहचविण्याच्या उद्देशाने जंगलात खड्डे करुन त्यात पुरुन ठेवलेले 450 सलाखे (Spikes) व कुकरमध्ये ठेवलेल्या आयडी सदृश वस्तू पोस्टे धोडराज येथे जमा केले.
सदरची कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडण्यास उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते, उपपोस्टे लाहेरी येथील प्रभारी अधिकारी संतोष काजळे, प्रशांत डगवार, सचिन सरकटे, आकाश पुयड व पोस्टे धोडराज येथील प्रभारी अधिकारी शरद काकळीज, अमोल सुर्यवंशी यांनी महत्वाची भूमिका बजावली. सदर नक्षल गावबंदी ठराव करणा­या पाच गावातील नागरिकांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अभिनंदन केले असून, अबुझमाड जंगल परिसरातील इतर गावातील नागरिकांनीे माओवाद्यांच्या खोट्या  प्रचाराला बळी न पडता स्वत:च्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहावे. गडचिरोली पोलीस दल सदैव तुमच्या पाठीशी असून गडचिरोली जिल्ह्रास माओवादी मुक्त जिल्हा करण्यात अशाच प्रकारची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.

Comments (0)
Add Comment