नागपुरातील संविधान चौकात सीटू तर्फे आशा वर्कर्स यांचे धरणे आंदोलन

आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांचे जुलै 2020 पासून चे वाढीव थकीत मानधन गट प्रवर्तकांचे मासिक 625 रुपये भत्ता व कुष्ठरोग – क्षयरोग च्या मानधनातही घट इत्यादी बाबत १५ डिसेंबर राज्यव्यापी संप करण्यात आला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. 15 डिसेंबर: 11 नोव्हेंबर 2020 रोजीचे शासकीय पत्रानुसार आशा व गटप्रवर्तकांचे वाढीव थकीत मानधन दिवाळीपूर्वी मिळणे अपेक्षित होते. मंत्री महोदयांनी आशा-गटप्रवर्तकांची दिवाळी गोड करणार असे जाहीर करून प्रसिद्धीही मिळवली होती. परंतु दिवाळी होऊन गेली, मात्र आजतागायत  कोणत्याही जिल्ह्यास्तरावर वा महानगर पालिकास्तरावर याची संपुर्ण अंमलबजावणी झालेली दिसत नाही, परिणामी करोना महामारीत काम करणाऱ्या 65000 योद्धाची दिवाळी विना मानधनावरच झाली हे अत्यंत खेदजनक आहे. तसेच राज्यशासनाने “माझे कुटुंब माझी जबाबदारी” कार्यक्रम राबविताना कोट्यवधी रुपयांचा खर्च जाहिरातीवर केला पण ही योजना राबविण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आशांना मात्र या बाबतचे मानधनही अध्यापी दिल गेलं नाही. गट प्रवर्तकांचा दैनिक रु 25/- प्रमाणे मासिक भत्ता रु 625/- जे या आर्थिक वर्षात बंद झाले आहे, या बाबतचे राज्य शासनाने अध्यापी कोणताच खुलासा केला नाही, त्या बाबत केंद्र शासनाशी काय पाठपुरावा झाला हेही अध्यापी कळाले नाही.  हे सर्व कमी की काय म्हणून शासनाने 1 डिसेंबरपासून कुष्ठरोग व क्षयरोगाचे सर्वेक्षणचे भत्ते 175 वरून 100 रुपये केले आहेत. या सर्वबाबीमुळे आशा कर्मचाऱ्यांत प्रचंड नाराजी पसरली असून ते काम बंद करण्याच्या मनःस्थितीत आहेत.

जिल्हास्तरावर कोणतेही प्रशासन त्यांना उत्तरे देतांना दमदाटीची व कामावरून कमी करण्याची अशोभनीय भाषा वापरताना नुकतेच कोल्हापूरमध्ये समोर ‘आले आहे. या सर्वंबाबतीत आम्ही कृती समितीच्या बैठकीत चर्चा करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर सारख्या महानगरपालिका आशा कर्मचाऱ्यांना सकाळी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावण्यास सांगत असून सकाळी पावणे दहा ते संध्याकाळी सव्वा सहा पर्यंत कामासाठी व मोबाईल द्वारे रिपोर्ट,  जिओ टॅग द्वारे हजर असल्याचे ग्रुप फोटो पाठवणे इत्यादी नवनवीन कामे सांगताना दिसत आहेत. असे असताना मुंबई NHM प्रशासन मात्र काहीच करतांना दिसत नाही. अशा नैराशाच्या परिस्थितीची गंभीरपणे दखल घेऊन त्वरित आशांचे प्रश्न सोडवावेत ह्या दृष्टीकोनातून दिनांक १५ डिसेंबर रोजी एक दिवसाचे काम बंद ठेऊन धरणे निदर्शनाचे कार्यक्रम घेण्याचं निर्णय कृती समितीने घेतला. १५ तारखेला काम बंद ठेऊन संविधान चौकात शेकडो आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांनी धरणे आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व राजेंद्र साठे, दिलीप देशपांडे, प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, कांचन बोरकर, नंदा लीखार, उज्वला कांबळे, शुभांगी चीचमलकर, अंजु चोपडे, गीता विश्वकर्मा, अरुणा शेंडे, मंदा जाधव, रुपलता बोबले, पुष्पा पुट्टेवार,लक्ष्मी कोतेजवार, तपस्या मेंढे, मंजुषा फतींग, संध्या पिल्लेवान, अलका जवादे, मंगला बागडे, माया कावळे, पिंकी सवाईथुल ई. शेकडो आशा वर्कर्स उपस्थित होत्या.

हे वाचा – शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या तोकड्या मदतीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका