देसाईगंज बाजारपेठेत दुसऱ्यांदा अग्नी तांडव…

लोकस्पर्ष न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ११ नोव्हेबर :-देसाईगंज शहराच्या मुख्य बाजारपेठेत दि.१० नोव्हेंबर च्या मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत तीन दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाले.

आग लागल्याचे माहिती होताच नागरिकांची एकच पळापळ सुरु झाली आणि  पुन्हा एकदा आग लागल्याचे कळताच खळबळ माजली आणि व्यापारी घटनास्थळी येवून आग विझविण्यासाठी प्रयत्न करू लागले शहरातील सामाजिक कार्यकर्तेच्या मदतीने देसाईगंज येथील अग्नीशमन वाहनांस पाचारण करताच अग्निशमन वाहन आणि सीआरपीएफचे जवान घटना स्थळीं दाखल झाल्याने त्यांच्या  मदतीने आगीवर बुधवारी पहाटे नियंत्रण मिळविण्यात यश आले. सदर आगीत मनेरी लाईनचे  तीन दुकाने जळून खाक झाली असली तरी देसाईगंज शहरात या वर्षात तब्बल दुसरी वेळ बाजारपेठेत आग लागण्याची घटना होत असल्याने संशय व्यक्त केल्या जात आहे. विषेश म्हणजे यापूर्वी झालेली घटना आणि रात्री लागलेली आग यामध्ये  बरेच काही साम्य दिसून येत असल्याचे नागरिकात चर्चा आहे. शेवटी आग लागण्याची दुसरी वेळ आहे त्यामुळे व्यापारी धास्तावले आहे. पोलीस विभागानी योग्य  चौकशी करण्यात यावी  आणि प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी व्यापाऱ्यांच्या वतीने जोर धरत आहे.