अहेरी नगरपंचायत सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन यशस्वी

येत्या २ दिवसांत थकीत वेतन मिळणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी 12 , जानेवारी :- अहेरी नगरपंचायत अंतर्गत 55 कंत्राटी सफाई कामगारांना 2 महिन्यांचे थकीत वेतन मिळावे ह्यासाठी भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांच्या मार्गदर्शनाखाली 3 दिवस कामबंद आंदोलन करण्यात आले होते, अहेरी नगरपंचायत प्रशासनाने थकीत वेतन त्वरित देण्याचे मान्य केल्यावर सदर कामबंद आंदोलन संपविण्यात आले होते, ह्या आंदोलनाची अहेरी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेत थकीत वेतन देण्याची कारवाई सुरू केली असुन येत्या 2 दिवसांत सर्व सफाई कामगारांना 2 महिन्याचे थकीत वेतन मिळणार आहे, तसेच समोर ही सफाई कामगारांना वेतन नियमित वेळेवर देण्याचे ही मान्य करण्यात आले आहे, त्यामुळे अहेरी नगरपंचायत सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हे देखील वाचा :-