लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
अहेरी, 1ऑगस्ट 2023 ; महसूल विभागाने वर्षभर केलेल्या विविध लोकाभिमुख कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवून कर्तव्याप्रति गतिमान व पारदर्शक राहण्याची आठवण म्हणून स्थानिक तहसील कार्यालयात एक ऑगस्ट महसूल दिन साजरा करण्यात आला.
मंचावर तहसीलदार फारुख शेख, नायब तहसीलदार नाना दाते, नायब तहसीलदार कल्पना सुरपाम , नायब तहसीलदार सय्यद उपस्थित होते. तालुक्यातील सहा महसूल मंडळ व 36 साझ्यापैकी काही मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांनी कार्यात तत्पर राहून महसूल विभागाला लोकाभिमुख काम करणाऱ्या तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
एक ऑगस्ट ते सात ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या महसूल सप्ताह निमित्त कर्मचाऱ्यांनी गावागावात सभा घेऊन महसूल विभागाविषयी आपुलकी निर्माण करण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार फारुख शेख यांनी केले.
व्ही. जे. गणवीर यांनी मनोगतात कोतवाल हा महसुलाचा पाया असल्याचे सांगितले. नायब तहसीलदार नाना दाते यांनी प्रस्तावनेत कर्मचाऱ्यांनी एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, युवा संवाद कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगितले. यावेळी उत्पन्न दाखले, रेशन कार्ड, संजय गांधी योजनेचे कार्ड लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन अहेरीचे मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर तर आभार प्रदर्शन विनोद दहागावकर यांनी केले.उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांमध्ये मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर,मंडळ अधिकारी इ. डी. कुडमेथे ,पूजा तलांडे, एजाज खान, सचिन मडावी, चंद्रकांत गवारे, पि. डी .शिवरकर, ए एल गडलवार, शैलेश दहागावकर, शामराव गोलकोंडा, वि.यन. भानारकर, वाय. एल.भिमटे, एस.एम गंगारप, व्ही. जे. गणवीर, जे एन खांडेकर, ए जे गोंगले व इतर कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन तहसिलदार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
हे पण वाचा :-