भिवंडीत सरकारी रुग्णालयाच्या ढासळत्या व्यवस्थेविरोधात AIYF चे आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भिवंडी, 15 नोव्हेंबर :-  शहरातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या ढासळत्या व्यवस्थेविरोधात AIYF चे काॅ. विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयाच्या गेटसमोर आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारच्या सूचनेनुसार भारतीय सार्वजनिक आरोग्य केंद्रांतर्गत ( IPHS ) चालविण्याची मागणी करण्यात आली.

प्रसूतीसाठी रुग्णालयात येणाऱ्या महिलांना मुद्दाम कळवा, ठाणे, मुंबई येथे रेफर केले जाते जेथे त्यांची नॉर्मल प्रसूती होते रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर आणि नर्सिंग यंत्रणा नसल्याने नागरिकांना ५० किलोमीटर दूर इतर शहरात उपचारासाठी जावे लागते. रूग्णालयात कार्यरत डॉक्टर व कर्मचारी रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी असभ्य वर्तन व भाषा करतात. ज्यावर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णालयातील स्वच्छतागृहांची स्वच्छता, एक्स – रे व सोनोग्राफी मशीन पुन्हा सुरू करणे. ओपीडी २४ तास सुरू करणे. रुग्णांना सकस आहार देणे. रुग्णांना मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याकडे विशेष लक्ष द्यावे, तज्ञ डॉक्टरांची भरती करावी सर्व विभागांमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. प्रसूतीसाठी महिलांची दिशाभूल न करता महिलांची प्रसूती सामान्य पद्धतीने व्हावी. अशा अनेक मागण्या अखिल भारतीय नौजवान सभेने केल्या.

यावेळी कामगार नेते कॉ. विजय कांबळे, कॉ. मदार खान, परवेज अन्सारी, आत्माराम विशे, रमेश जाधव, ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय लोलेवार , राज्य कोषाध्यक्ष इक्बाल हुसेन खान, भिवंडी शहर परिषदेचे अध्यक्ष सैफ एजाज मोमीन, शहर सचिव शहजाद कलीम सहसचिव जैन अन्सारी, शहर कोषाध्यक्ष जावेद खान तसेच शेकडो महिला पुरुष कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा :-

Bhiwandigovernmenthospital