नऊ महिन्यानंतर अजिंठा व वेरुळ लेणी उद्यापासून पर्यकांसाठी खुली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

औरंगाबाद, दि. ९ डिसेंबर: – कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नऊ महिन्यापासुन बंद असलेल्या अजिंठा व वेरुळ लेण्या उद्यापासुन पर्यटकांसाठी खुल्या होत आहे. मात्र लेणीत ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरच प्रवेश मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दर दिवशी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित राहणार असून दर दिवशी सकाळी एक हजार आणि दुपारच्या सत्रात एका हजार अशा एकुण दोन हजार याप्रमाणे पर्यटकांना दरदिवशी मर्यादित प्रवेश दिला जाईल असेही प्रशासनाने सांगितले आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सर्व खबरदारीच्या उपाययोजनांसह सुरू करण्यात येतील जेणे करून पर्यटनस्थळावर अवलंबुन असणारे गाईड, दुकानदार, स्थानिक कारागीर, हॉटेल चालक, वाहतुक व्यवसाय करणारे ट्रान्सपोर्ट कंपनी यांना रोजगार मिळेल. या सर्व संबंधितांची कोरोना चाचणी त्या-त्या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी करण्याची सुविधा संबंधित यंत्रणेने तातडीने उपलब्ध करावी अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच पर्यटनस्थळी टुरिस्ट गाईड यांच्याव्दारा पर्यटकांना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.