लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी काल ग्रामपंचायत कार्यालय नागेपल्ली येथे भेट देवून कोविड संदर्भातील आढावा घेतला. सर्व जनतेनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे व कोणत्याही अफवांवार विश्वास न ठेवता लसीकरण करावे असे आवाहन केले.
यानंतर जि. प. अध्यक्षांनी शासकीय मुलींचे वसतिगृह नागेपल्ली येथील कोविड सेंटर ला भेट देवून पाहणी केली. यावेळी नागेपल्लीचे सरपंच लक्ष्मण कोडापे, उपसरपंच रमेश शानगोडावार, आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, नागेपल्ली ग्रा.प.सदस्य मलारेड्डी येमनुरवार, खुशाल कट्टावार, गणेश दुर्गे, नागेपल्लीचे ग्रामसेवक एल.के. पाल, आलापल्लीच्या ग्रामसेविका गेडाम उपस्थित होते.
हे देखील वाचा :
महिलांची प्रगती म्हणजे समाजाची प्रगती : भदंत डॉ. चंद्रकीर्ती
(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स च्या ५६ जागांसाठी भरती