लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी , 16 जून – अहेरी तालुक्यातील ग्रा.प.इंदाराम अंतर्गत येणाऱ्या गेर्रा येथील रहिवासी शोभा बापू रामगीरी यांना कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे आणि त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्यांनी उपचार घेण्यासाठी अडचण होत होती शोभा बापू रमगीरी यांच्या प्रकृतीची माहिती गेर्रा येथील कार्यकर्त्या कडून आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांना माहिती मिळताच त्यांनी कॅन्सर ग्रस्त शोभा बापू रामगीरी यांच्या स्वगृही जाऊन तब्बेतीची विचारपूस करून पुढील औषधंउपचारा करिता मुलगा नामे तिरुपती बापू रामगीरी याना आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,सौ.वर्षाताई प्रल्हाद पेंदाम ग्रा.पं.सरपंच इंदाराम,सौ.जयाबाई बापु तेलंगे ग्रा.पं सदस्य इंदाराम, गुलाबराव सोयांम माजी सरपंच व विद्यमान सदस्य,पोचुबाई तेलंगे, किशोर तेलंगे, बाबुराव रामगिरी, बापू तेलंगे, लक्ष्मण आत्राम,राकेश सडमेक, विनोद रामटेके,रवी भोयर, नरेश गर्गम सह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हे पण वाचा :-