अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते विविध ठिकाणी ध्वजारोहण!

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली,15 ऑगस्ट 2023 :आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते आज १५ ऑगस्ट रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती अहेरी व पुष्पप्रियादेवी शाळा किस्टापूर या विविध ठिकाणी ध्वजारोहन संपन्न झाला. त्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी स्वातंत्र्य दिनाच्या समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ७६ वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहाने आनंदाने,देश भावनेने प्रेरित होऊन,भारत मातेच्या गर्जनात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित रवींद्र बाबा आत्राम बाजार समिती उपसभापती,महेश गुप्ता सचिव बाजार समिती अहेरी, हेमंत देशमुख सहसचिव,शामराव बोंमनवार लेखापाल, महेश गददेवार निरीक्षक, मयूर गुम्मूलवार क.लिपिक, तिरुपती अय्यला क.लिपिक बाजार समिती अहेरी, लीलाधर गोधारे,जीवन तलांडे शिपाई, संतोष दोतुलवार,सचिन बिरेल्लीवार, प्रकाश मद्दीवार, श्रीनिवास गददेवार,राजू मद्देर्लावार,मलरेड्डी ओडेट्टीवार, प्रशांत आईलवार, महेश गड्डमवार, भोयर,रवी जन्नमवार,गौरकर,साबय्या तुमडे,सतीश पर्वतालवारसह पुष्पप्रियादेवी शाळा किस्टापूर व बाजार समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिंनी तसेच आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे पण वाचा :-