महाराष्ट्रदिनी घेतला दारूबंदीचा ठराव

विसोरा ग्रामपंचायत आकारणार दारू विक्रेत्यांवर दंड
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 2 मे :- देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या विसोरा गावाने महाराष्ट्र दिनी दारूबंदीचा ठराव पारित केला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड देखील वसूल करण्यात येणार आहे. विसोरा ग्रामपंचायत अंतर्गत गावाला अवैध दारू विक्री मुक्त करण्यासाठी बैठकीचे आयोजन करून ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी चर्चा केली. यावेळी गावातील अवैध व्यवसाय बंद करणे, नियमांचे उल्लंघन करून दारू विक्री केल्यास प्रथम 5 हजार, दुसरा 10 हजार व तिसऱ्यांदा नियमाची पायमल्ली केल्यास 20 हजार रुपये एवढा दंड आकारणे, शासकीय दाखले बंद करणे, ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये नोटीस लावून अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी सूचना करणे, दारूविक्रेत्यांवर कारवाई करणे आदी निर्णय घेण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत समितीचे अध्यक्ष सरपंच रमेशकुमार कुथे, उपाध्यक्ष संजय करांकर, मुक्तीपथ तालुका संघटनेच्या अध्यक्षा शेवंताबाई अवसरे, कोषाध्यक्ष मंगला देवढगले, पोलीस पाटील भामीला सहारे, तंमुस अध्यक्ष ऋषी नाकाडे, ग्रामविकास अधिकारी अनिल आडे, ग्रामपंचायत सदस्य ऍड. प्रमोद बुद्धे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसंघटनेच्या अध्यक्ष व सदस्य, अंगणवाडी सेविका, आशाताई, बचत गटाच्या महिला, मुक्तीपथ तालुका संघटक भारती उपाध्ये, तालुका प्रेरक अनुप नंदगीरवार यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
हे पण वाचा :-