लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात होऊ घातलेली निवडणूक ही दारूमुक्त व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या स्वीप कार्यक्रमा अंतर्गत मुक्तिपथतर्फे विविध उपक्रमाच्या माध्यमातून जाणीव-जागृती केली जात आहे. चामोर्शी तालुक्यातील शहरासह विविध गावांतील मुख्य ठिकाणी व्हिडीओ व्हॅनच्या माध्यमातून लोकांना दारूमुक्त निवडणुकीचा संदेश दिले जात आहे.
तरी मतदारांनी दारूच्या बाटलीला बळी न पडत मतदान करावा व योग्य उमेदवाराची निवड करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.