अमरावती जिल्ह्यात अलर्ट, अनेक ठिकाणी पावसाचे पाणी शिरले घरात, नदी नाले दुथडी भरून लागले वाहू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमरावती, 20 – अमरावती जिल्ह्यात मागील 48 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी घरात शिरले असून नदी नाले, दुथडी भरून वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नदी काठच्या गावांना व इतर भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्यात मागील 48 तासापासून रिमझिम पाऊस सुरू आहे. सतधार पावसामुळे शेतीचे काम थांबले असून अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. विविध तालुक्यातील स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या मेळघाटातील लहान-मोठे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे काही गावांमध्ये संपर्क तुटला. अनेक ठिकाणी किरकोळ स्वरूपात दरळ व झाडे उन्मळून पडल्याने चित्र आहे.

यासोबतच अचलपूर चांदूरबाजार या भागात अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. तर काही गावांमध्ये जीर्ण झालेल्या घराच्या भिंती कोसळल्या आहेत. अंजनगाव दर्यापूर तालुक्यांमध्ये असलेल्या केळी पिकाचे यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहेत. आतापर्यंतचे गर्मी व अचानक आलेल्या पावसाने निर्माण झालेल्या वातावरणामुळे केळी झाडावरच पीक असल्याची माहिती शेतकरी देत आहेत.

अचलपूर परतवाडा भागात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याने होल्टेज कमी अधिक झाल्यामुळे अनेक लोकांच्या घरातील विद्युत उपकरणे निकामी झाल्याची चर्चा सुद्धा काय शहरांमध्ये होती. तिवसा धामणगाव रेल्वे चांदुर रेल्वे या भागामध्ये सुद्धा समाधानकारक पाऊस झाला असून काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाले आहे. अमरावती बडनेरा शहर काही भागात पावसाचे पाणी शिरले असून काही प्रतिष्ठानांचे नुकसान झाले आहे. अमरावती शहरातील खापर्डे बगीचा परिसरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अलर्ट दिला असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चमू सुद्धा सक्रिय झाले आहेत.