लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अलिबाग, 12 नोव्हेंबर :- रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अलिबाग च्या तहसीलदार मिनल दळवी यांना नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोन लाखाची लाच घेताना अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथील निवासस्थानी ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, अलिबाग तहसीलदार मिनल दळवी यांनी तक्रारदार यांच्याकडे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. मात्र दोन लाखांवर तडजोड करण्यात आली होती. तक्रारदार यांना दोन लाखांची रुपये घेऊन गोंधळपाडा येथील निवासस्थानी बोलावले.
तक्रारदार यांनी मिनल दळवी यांना दोन लाखाची लाच घेताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
लाच लुचपत विभागाने तहसीलदार मिनल दळवी याना अटक करताच, त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना ताबडतोब जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख, पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे आणि पथकाने ही कारवाई केली आहे.
हे देखील वाचा :-
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात अण्णा हजारे यांचे पावित्र्य राखा : डॉ. शिवनाथ कुंभारे