बचत गटांना मानव विकास योजना अंतर्गत ‘रिपर’ हे औजार अनुदानावर वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २३ मार्च: मानव विकास योजना २०२०-२१ अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी, महिला शेतकरी बचत गट, शेतकरी बचत गट, सेंद्रीय शेतकरी बचत गट यांना ‘रिपर’ हे औजार उपलब्ध करुन देण्याकरीता प्रस्तावित कार्यक्रम अंतर्गत अनुदानावर वितरीत करावयाचे आहे. त्याकरीता तालुका धानोरा, कोरची, कुरखेडा, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या शेतकरी गटांनी रिपर यंत्र ९०% अनुदानावर उपलब्ध करुन घेण्याकरीता आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा. सदर योजना सुटीवर असुन लाभार्थी हिस्सा १०% व GST करासह लाभार्थी यांना भरणा भरावयाचा आहे. तरी इच्छुक गटांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) गडचिरोली यांनी केले आहे.

reaper