लॉकडाऊनमध्ये दूध डेयरी उघडण्यास परवानगी द्या – दूध डेयरी मालकांची जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती : अमरावती जिल्हात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज पासून १५ मे पर्यंत सात दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

यात केवळ मेडिकल व हॉस्पिटल सुरू राहणार आहेत तर कडक लॉकडाऊन दरम्यान जिल्ह्यातील दूध डेयरी सुद्धा बंद करण्यात आल्याने आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर दूध डेअरी मालक धडकले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या लॉकडाऊनमध्ये दूध डेयरी उघडण्यास परवानगी द्या. अशी मागणी त्यांनी केली आहे.

जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसला आहे. कारण जिल्ह्यात अडीच लाख लिटर दूध हे वेगवेगळ्या दूध डेयरीवर जातात. त्यामुळे पुन्हा एकदा या लॉकडाऊनमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. दूध हे मनुष्यासाठी रोजचे जीवनावश्यक वस्तू आहे. मात्र या लॉकडाऊन मध्ये दूध डेयरी बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे दूध संकलन बंद असल्याने नागरिकांना देखील दूध मिळत नाही तर शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसला आहे.  त्यामुळे दूध डेयरी सुरू करण्याची मागणी दूध डेयरी मालकांनी जिल्हाधिका-याकडे केली आहे.

हे देखील वाचा :

डीआरडीओमध्ये ७९ पदांवर संधी

९ वर्षाच्या चिमुकलीने देश कोरोनामुक्तीसाठी पवित्र रमजान महिन्याचे ठेवले सर्व रोजे

Amravati Farmer.lead story