लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १९ जुलै : आज दिनांक १९ जुलै २०२१ रोजी, पेरमिली परिसरातील सर्व नागरिकांनी आदिवासी समाजाच्या वतीने ९ आगस्ट २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करून, जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यास परवानगी देण्यासंदर्भात अहेरीचे तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदिवासी विकास मंत्री ऍड. के.सी.पाडवी यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
यावेळी निवेदनात म्हटले आहे की, जगातील १९२ पेक्षा जास्त सदस्यत्व असलेली संयुक्त राष्ट्र संघ ( UNO) ने सन १९९४ चा ११ वे अधिवेशनात जगभरात असलेले सर्व आदिवासी समाजातील लोकांना न्याय देण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि आदिवासी समाजाची संस्कृती, बोली भाषा, रूढी, प्रथा, परंपरा याचे जतन करण्यासाठी व आदिवासी समाजाला त्याचा पारंपरिक व संंवैधानिक अधिकार मिळण्याकरिता म्हणून संयुक्त राष्ट्र संघ (UNO) ने ९ आगस्ट १९९४ या दिवशी International day of indigenous people अर्थात जागतिक आदिवासी दिवस घोषित करण्यात आला.
म्हणून त्या दिवसापासून जगातील १९२ देशापेक्षाही अधिक देशामधील आदिवासी समाज हा जागतिक आदिवासी दिवस मोठ्या गौरवाने साजरा करत आहेत.
म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजसह महाराष्ट्रात असलेले सर्व आदिवासी समाज सुद्धा शासनाचा कोविड-१९ चे सर्व नियम पाडत जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यास परवानगी देण्यात यावी अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर निवेदन अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी स्वीकारले.
यावेळी निवेदन देतांना येरमनार चे माजी सरपंच बालाजी गावडे, कमलापुरचे माजी सरपंच संबय्या करपेत, राजेंद्र इष्टम- ग्रा.पं. सदस्य पेरमिली, जी. के. मडावी सर राजाराम, बंडू आत्राम – आलदांडी, लाच्या आत्राम – आसा, शंकर आत्राम – माजी उपसरपंच कमलापुर आदींची उपस्थिती होती.
हे देखील वाचा :
नागपुरात जिल्ह्यात ब्लॅक फंगसने एकाचा मृत्यू तर चार जण बाधित
केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यमिता सल्लागार समितीच्या सदस्य पदावर खा. अशोक नेते यांची नियुक्ती