रानमाळावर गवताचे पाते शोधणाऱ्या दुर्मिळ सुगरण पक्ष्यांचे घरटी बनविण्यासाठी लगभग सुरू

पक्षी, प्राणी जंगलात अत्यंत नवचैतन्याच वातावरनाणे न्हावून निघाले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली – गडचिरोली जिल्हा तसाही निसर्गरम्य वातावरणाने फुलून गेलेला आहे. यात पक्षी, प्राणी जंगलात अत्यंत नवचैतन्याच वातावरनाणे न्हावून निघाले आहे.अशातच इवलुशी सुगरण आपल्या राहण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसांत सुगरण पक्ष्यांच्या विणीचा हंगाम असतो.

धरतीने हिरवा शालू परिधान करताच या पक्ष्याला विनीच्या हंगामाचे वेध लागतात. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील रानमाळावर आणि ग्रामीण भागात, विहिरीच्या काठावर असलेल्या झाडा झुडपावर सुगरण पक्ष्यांमध्ये घरटे बांधायची लगबग सुरू झाली आहे. सुगरण पक्ष्यांचा विनीचा हंगाम सुरू झाल्याने विहरी काठच्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट दिसून येत असून सकाळी अत्यंत मनाला प्रसन्न करणारा किलबिलॅट कला येत आहे..

एका घरात बिबट्याची प्रसूती, तीन बछड्यांना दिला जन्म