Loksparsh – स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!! Online news Portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
  • facebook
  • twitter
  • google_plus
  • Email
Loksparsh – स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!! Online news Portal

आधीच कोरोना महामारीचे थैमान, त्यात नागरिकांच्या बँक खात्यावर सायबर हल्ला!

By Loksparsh Team on April 15, 2021
  • नागरिकांच्या आकाऊंट मधून परस्पर गेले पैसे.
  • डोंबिवली मधील आय.डी.बी.आय बँकेत घडला प्रकार, नागरिक झाले हैराण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

डोंबिवली, दि. १५ एप्रिल:  डोंबिवलीच्या फडके रोड येथील आय.डी.बी.आय बँकेतून गुडीपाडवाच्या दिवशी अनेकांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे गेल्याची घटना घडली आहे.

आधीच कोरोनाचे संकट त्यातच नववर्षाच्या पहिल्या दिवशी आय.डी.बी.आय बँकेत सायबर हल्ला झाल्यामुळे बँक खातेदारांना जबर फटका बसला आहे. खातेदाराच्या सेविंग आकाऊंट, पेन्शन आकाऊंट मधून मोठमोठाली रक्कम गेल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. आता नागरिकांनी जवळील पोलीस स्थानकात धाव घेऊन याची तक्रार दाखल सुद्धा केली आहे. यासंदर्भात बँक प्रबंधकाना विचारलं असता वरिष्ठांकडे तक्रार दिली असल्याचे सांगितले. सायबर हल्ला कसा झाला याची चौकशी सुद्धा आम्ही करतो असेही त्यांनी सांगितले. मात्र कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला.

डोंबिवली च्या आयडीबीआय बँक च्या खातेदाराचे पैसे गेल्याची बातमी माध्यमांमध्ये आली व आता पर्यंत ३० जणांच्या तक्रारी आल्या असून पोलिसांनी देखील यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

एटीम फ्रॉड झाल्याची माहिती डोंबिवली चे एसीपी जयराम मोरे यांनी सांगितले तर आयडीबीय बँक चे तीन कर्मचारी व एक सुरक्षा रक्षक यांचे पैसे खातेमधून गेल्याची माहिती मोरे यांनी दिली आहे.

Cyber Attack on Bank Account holders
  • Maharashtra
Share
Related Posts

नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीची प्रशासनाची जय्यत तयारी

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडून स्ट्राँग रूम व मतमोजणी व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी

तुमरकोठीत २४ तासांत नवे पोलीस स्टेशन उभारणी — अतिदुर्गम भागातील सुरक्षेस मोठा आधार

नागरी कृती कार्यक्रमांतर्गत अल्लापल्ली येथे मुलांसाठी मूलभूत संगणक प्रशिक्षण

गणपत तावाडे अपघातप्रकरणी कारवाईचे आश्वासन; आलापल्लीतील चक्काजाम आंदोलन मागे

बहुजन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते गणपत तावाडे यांचे अपघाती निधन; आलापल्ली येथे चक्काजाम, न्यायाच्या मागणीवर ठाम भूमिका..

पोलिसांनी केला अवैध कोंबडा बाजार उद्ध्वस्त; १६ जणांवर गुन्हा, ११ दुचाकींसह सुमारे ३.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त..

  • Home
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy
View Desktop Version