येरमनार परिसरातील समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध – जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. १० डिसेंबर: अहेरी तालुक्याच्या मुख्यालयापासून ५० किमी अंतरावर असलेल्या अतिसंवेदनशील व आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या येरमनार येथे ग्रामपंचायत कार्यालय असून या ग्रामपंचायतीत कोरेपली, कावटाराम, मिंचगुंडा आदि गांवाच्या समावेश येते. मात्र स्वांतत्र्याच्या ७० वर्षानंतरही या भागाचा विकास झालेला नाही. या भागात अनेक प्रमुख समस्या आजही नागरिकांना भेडसावत आहेत. या गावांना जाण्यास आजही पक्के रस्ते नाहीत, पुल, विज नाहीत, पिण्याच्या पाण्याची समस्या असून याकडे स्थानिक ग्रामपंचायत कडून दुर्लक्ष केले जात आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सदर परिसरात ९ डिसेंबर रोजी दौरा करून येरमनार येथे सभा घेवुन गावातील नागरिकांशी सखोल अशी चर्चा केली असता सन २०१८  तेंदु बोनस मिळाले नसून तेंदु पुड्डा मात्र सरपंच व ग्रामपंचायत कडून ठेकेदाराला विक्री केले असल्याचे सांगण्यात आले.                        

जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार येरमणार गांवात गेल्याने तेथील नागरीकांना खूप आनंद झाला. असे वक्तव्य नागरिकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.  या गांवात निर्मितीपासून आम्ही मतदानाचा हक्क बजावुन लोकप्रतिनिधी निवडुन देत असतो मात्र स्थानिक क्षेत्रातून निवडुन आल्यानंतर मात्र याकडे दुर्लक्ष करत असतात. मात्र या गांवात केव्हाच येत नाही समस्या जाणून घेत नाहीत मात्र अजय कंकडालवार हे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष आहेत आमच्या गावात येऊन समस्या संदर्भात आमच्याशी चर्चा केली. नागरिकांसोबत तीन तास चर्चा करून समस्या ऐकून घेतल्या व त्यांचे निराकरण करून देण्याची ग्वाही दिली असून यावर नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या सभेच्या अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे होते, प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती गीताताई चालुरकर, जि.प.सदस्य अजय नैताम, जि.प.सदस्या सुनीता कुसनाके, प.स.सदस्या शितलताई दुर्गे, पं. स. सदस्या योगीताताई मौहूर्ले, पं. स. सदस्या छाया पोरतेट, पेरमिलीचे सरपंच प्रमोद आत्राम, किस्टापूरचे माजी सरपंच अशोक येलमूले, येरमनारचे ग्रा.पं.सदस्य विजय आत्राम, प्रतिष्ठित नागरिक डोलु मडावी, इंद्रशाह आत्राम, डोलु तलांडी, आडवे आत्राम, जयराम कोंडागूर्ले, दशरथ रामटेके, वारलू मडावी, प्रभाकर झाडे, हीरामन झाडे, वाघा तलांडी, काटा आत्राम, राजू तलांडी, रामा आत्राम, नामदेव कोंडागूर्ले, बाजू पूँगाटी, पत्रकार आशीफ खाँ पठाण, श्रीकांत बंडामवार, तुळशीराम चंदनखेळे, कवीश्वर चंदनखेडे, लक्ष्मण कूळमेथे, व्ही. सी. कोंडागूर्ले, सचिन सिद्दमशेट्टीवार, श्रीकांत दहागावकर, नवलेश आत्राम, बंडु आत्राम आदि मंचावर उपस्थित होते. यावेळी गावातील नागरिक, महिला बचत गटाचे महिला व युवक उपस्थित होते.