लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : १० डिसेंबरला माजी आमदार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात सत्कार समारंभ पार पडला.
सत्कार समारंभात बोलताना डॉ. देवराव होळी यांनी म्हटले की, मागील दहा वर्षे आपण मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली व आपल्या आशीर्वादानेच मी या विधानसभा क्षेत्राचा आमदार झालो. विकास करण्याची प्रेरणा मिळाली. आता जरी आमदार नसलो तरी जनसेवेसाठी कायम तत्पर राहणार आहे. दर सोमवार व गुरुवारला जनता दरबार भरवून जनतेच्या समस्या सोडविणार असल्याची घोषणा माजी आमदार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी दिली.
वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. देवराव होळी व बिनाराणी होळी यांचा १० डिसेंबरला शहरात सत्कार समारंभ पार पडला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वय किसन नागदेवे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, विधानसभा समन्वयक प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शाहा, शिंदेसेनेचे सहसंपर्कप्रमुख हेमंत जंबेवार, रामायण खटी, रमेश भुरसे, मिलिंद घरोटे, गुरुदेव सेवा मंडळाचे केशवराव दशमुखे, कृउबा सभापती शशिकांत साळवे, अनंत साळवे, बबलू हुसैनी, माजी पं.स. सभापती मारोतराव इचोडकर, माजी पं.स. उपसभापती विलास दशमुखे, संजय निखारे आदी उपस्थित होते.
हे ही वाचा,