टायगर ग्रुप प्रमुख मा. तानाजी जाधव यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रुग्णसेवेसाठी अल्लापल्ली येथे रुग्णवाहिका भेट.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

तालुका प्रतिनिधी :- सचिन कांबळे

गडचिरोली, दि. 03 नोव्हेंबर: जिल्ह्यातील दक्षिण भागातील आलापल्ली हे शहर पाच तालुक्याला जोडणारं प्रमुख शहर आहे. आलापल्ली शहरातूनच भामरागड , सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी तसेच चंद्रपूर-गडचिरोली कडे आवागमन करण्यासाठी आलापल्ली हेच गाव मध्यवर्ती केंद्र आहे. शिवाय पाचही तालुका नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात मोडत असून उद्योग विरहित जिल्हा आहे. दुर्गम भागातील कुठल्याही आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास ॲम्बुलन्स किंवा वाहन वेळेवर उपलब्ध होत नाही. आजही दक्षिण भागात खेड्यापाड्यात जाण्यासाठी धड रस्ते नाही, विज नाही, आज ही परिस्थिति जैसे थे आहे. याचा फटका नागरिकांना सहन करवा लागतो .शेती शिवाय काम नसल्याने या भागातील नागरिक आर्थिक परिस्थित कठिन सामना करीत जीवन जगत आहे. अशातच कुठलीही आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास आर्थिक परिस्थिति बेताची असल्याने खाजगी वाहन बोलविने शक्य नाही . हीच अड़चन लक्षात घेवून टायगर ग्रुप ने अंबुलन्स ने रुग्णांना आवागमन करण्यासाठी रुग्नवाहिका उपलब्ध केली आहे.
आज ही दुर्गम भागात रुग्नवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नसल्याने कितीतरी दुर्गम भागातील नागरिकांना आपल्या जीवास मुकावे लागले. मात्र हीच परिस्थिती लक्षात घेऊन आलापल्ली येथील टायगर ग्रुपचे कार्यकर्ते यांनी टायगर ग्रुप चे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख तानाजी जाधव यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून रुग्णांसाठी रुग्णवाहिका भेट दिली आहे. कठीण परिस्थितीमध्ये रुग्णांना सेवा देणे, सेवा करणे हेच मुख्य उद्देश ठेवून शहरा सोबत दुर्गम भागातील नागरिकासाठी अडीअडचणीत मदत होत होईल शिवाय दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर अंबुलन्स जाता येता येईल उपचार घेता येईल हीच भावना असल्याने टायगर ग्रुपचे सर्वतोपरी कौतुक होत आहे.