अमित शहा यांनी मुंबई भाजपा नेत्यांना झापले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 12 सप्टेंबर :-  गणेशोत्सव काळात मुंबईतील सर्व प्रमुख गणेशोत्सव मंडळांना आणि प्रमुख राजकीय नेत्यांच्या घरी श्रीगणेशाचे दर्शन घेतल्यावर त्यांनी मुंबईतील कार्यकर्त्यांचा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत रणनीती ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात मुंबई भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना चांगलेच झापले.

मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आपल्या भाषणात म्हणाले की, अमितजी, आपल्या उपस्थिती मुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहपूर्वक वातावरण आहे. तोच धागा पकडत अमित शहा म्हणाले की,’ मुंबईत भाजपाचे कार्यकर्ते हे सुशेगात आहेत. तुम्हाला वाटते एवढी ही निवडणूक सोपी नाही. तेव्हा कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. त्याचबरोबर शिंदे गटाबरोबर युती करण्याचे सूतोवाच देखील अमित शहा यांनी केले. यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणावपूर्ण वातावरण आहे.

हे देखील वाचा :-

Amit shahbjpledresbmcelectionmumbai