लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती ०१ नोव्हे :- महाराष्ट्रात सध्या तीन पक्षाचा सरकार असून त्याला महाविकास आघाडी सरकारचा नाव देण्यात आलेला आहे परंतु महाविकास आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य निधी देत नसल्याचा या सोबतच काँग्रेस शासीत महापालिकांमध्ये काँग्रेस सोबत दुजाभाव करत असल्याचा घणाघाती आरोप अशोक चव्हाण यांनी परभणीत केला होता त्यावर बोलताना आमदार रवी राणा यांनी हे सरकार बिहार निवडणुकांनंतर पडेल व शिवसेना हे विरोधी पक्षात बसेल असा पुनरुच्चार केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आमदार रवी राणा यांना कितपत गांभीर्याने घ्यायचे यावर राजकीय मंडळी तर्क वितरकाला उधान आलेला आहे.