बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्याचा आज झाला महत्वपूर्ण निर्णय

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क

नागपुर, १४ जुले:-  नागपुरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्याचा महत्वपूर्ण निर्णय आज झाला.. विशेष सरकारी वकील श्री उज्वल निकम यांनी जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे डीजे 10 श्री. एस. बी. गावंडे यांच्या न्यायालयात कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्यात सरकारतर्फे व आरोपी तर्फे अंतिम युक्तिवाद झाला. या प्रकरणात फिर्यादी रवीकांत कांबळे यांची आई व दीड वर्षाच्या मुलीची 17 फरवरी 2018 रोजी निर्घृण पणे हत्या करण्यात आली होती.


तपासात एकूण चार आरोपी निष्पन्न करून एसीपी बनसोड कोतवाली यांनी दोषारोप पत्र दाखल केले होते .युक्तीवादा दरम्यान विशेष सरकारी वकील श्री उज्वल निकम यांनी असे सांगितले की आरोपी विरुद्ध सरकार पक्षाने पुरावा कायद्याचे अनुषंगाने सबळ पुरावे कोर्टा समोर सिद्ध केले आहे.