मॅजिक बस संस्थेचा अभिनव उपक्रम; “शाळा बंद शिक्षण सुरू”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : राज्यात कोरोनाने थैमान घातले असल्याने राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.  रोजच्या रोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघून  सर्वच शाळा, कॉलेज बंद करण्यात आले आहेत. खाजगी शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन पद्धतीने विविध विभागाचा अभ्यासक्रम आर्थिक गुंतवणूक केलेल्या विद्यार्थ्यांना खाजगी संस्थेद्वारे आजही ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरु असल्याचे पहावयास मिळते. मात्र यातही माध्यमिक नंतरच्या अभ्यासक्रमाला शिक्षण विभागाने मंजुरी दिली असली तरी प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांचे पारंपारिक शिक्षण देणे बंद आहे.

मॅजिक बस चंद्रपूर संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडेने याच बाबीकडे लक्ष केंद्रित करून त्यांच्या मार्गदर्शनात चंद्रपुर जिल्ह्यातील मूल, सावली, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर, पोंभुर्णा, गोंडपीपरी तालुक्यात SCALE”  कार्यक्रमाअंतर्गत शाळांमध्ये १२ ते १६ वर्षे वयोगटातील ३८,००० विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “खेळातून शिक्षण/जीवन कौशल्य विकास” या कार्यक्रमातून मागील दोन वर्षा पासून अविरत उपक्रम राबविण्यात येत आहे.

राज्यभरात कोरोना प्रादुर्भावाने सध्या शाळा बंद असल्या तरी मॅजिक बस संस्थेच्या वतीने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीच्या माध्यमाने जीवन कौशल्य शिकविण्याचे कार्य सदैव सुरू आहे. सदर संस्थेचा हेतू मुख्यता विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्यातून विकास होऊन शाळेतील मुख्य विषयांमध्ये भाषा, गणित, विज्ञान या विषयांच्या अभ्यासक्रमात खंड पडू नये हाच मुख्य हेतू मॅजिक बस संस्थेने हेरला असून संस्थे अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्याकडून उपक्रम राबविला जात आहे. यासाठी गावातील समुदाय समन्वयक सातत्याने प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा सारांश तयार करून त्या-त्या विषयाचा गृहपाठ देणे, पाढे पाठांतर करायला सांगणे, गणिताची आकडे मोड करणे, शिवाय सूत्र पाठांतर करणे या सर्व बाबी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. यासाठी पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने भ्रमणध्वनीद्वारे शिक्षण देऊन अधिक सातत्य निर्माण करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ०९ तालुक्यात असलेल्या ३३२ गावांमध्ये ३८,००० विद्यार्थ्यांना मिळतोय लाभ.  

या कार्यक्रमासाठी मॅजिक बस संस्थेतील संपूर्ण तालुक्यात कार्यरत असलेले तालुका समन्वयक, निकिता ठेंगणे, योगेश मोरे, सुपडा वानखेडे, नितेश मालेकर, हिराचंद रोहनकर, तसेच संपूर्ण ०९ तालुक्यातील ३० शाळा सहाय्यक अधिकारी व गावातील ३३२ समुदाय समन्वयक हे अथक परिश्रम घेत असून हा उपक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा आहे.

हे देखील वाचा :

बुरशीजन्य आजार… म्युकरमायकोसीस!

(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

कोल्हापूर महानगरपालिकेत ८५ वैद्यकीय जागांसाठी भरती

 

lead storyMagic Bus FoundationPrashant Lokhande