लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 18,ऑक्टोबर :- संपूर्ण महाराष्ट्रात गाजावाजा झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूकीची आता फक्त औपचारिकता राहिली आहे. शिवसेना फुटल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक होती, त्यामुळे शिवसेना ठाकरे गटासहित मविआ आघाडी त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठतेची केली होती.
त्यामुळे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नीला फॉर्म भरण्याच्या क्षणापासून संघर्ष करावा लागला. इतकेच नव्हे तर त्यांना मुंबई महानगरपालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारावा यासाठी त्यांना हायकोर्टाचे उंबरठे झिजवावे लागले.एव्हढेच नव्हे तर त्यांच्यावर महानगरपालिकेत कामावर वेळेवर येत नसत या आरोपापासून ते त्या जागेच्या दलाली करायच्या या आरोपांना त्याना सामोरे जावे लागले. न्यायालयाने लटके यांच्या बाजुने निकाल दिल्यानंतर महानगरपालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकृत केला. फॉर्म भरून प्रचार सुरू झाल्यानंतर मात्र चक्रे फिरली. जेष्ठ नेते शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर भाजपने आपले उमेदवार मुरजी काका पटेल यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली. तरीही ६ अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला निवडणूक लढविणे अपरिहार्य आहे. पण मशाल ही निशाणी घराघरात पोहचविण्याची ही उत्तम संधी शिवसेना ठाकरे गटाला चालून आली आहे.
ऋतुजा लटके यांची लढत इतर ज्या सहा जणांविरोधात होणार आहे. त्यात आपकी अपनी पार्टीचे बाला व्यंकटेश विनायक नाडार, राईट टू रिकॉल पार्टीचे मनोज श्रावण नायक, अपक्ष उमेदवार नीना खेडेकर, फरहाना सिराज सय्यद, मिलिंद कांबळे आणि राजेश त्रिपाठी आदी उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मतदान होणार आहे.
हे देखील वाचा :-