अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्यांचा ५५ टन कांदा दिला पेटवून; ९ लाखांचे झाले नुकसान

चाळीत असलेला कांदा जळून खाक ९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शेतकऱ्यांने दिली माहिती..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

दौड : तालुक्यातील कासुर्डी या गावातील कांदा उत्पादक शेतकरी नाना वसंत जगताप यांच्या कांदा चाळीला अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी रात्री आग लावल्याची घटना घडली. या आगीत वाखारीतील ५५ टन कांदा जळून खाक झाल्याने सुमारे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्रशासनाने लावलेल्या संचारबंदीत कांद्याला भाव नाही आणि विक्री व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नाना वसंत जगताप यांनी काही दिवसांनी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने एकूण ५५ टन कांदा वखारीत साठवून ठेवला होता. मात्र ७ मे रोजी रात्री ११ ते १२ च्या सुमारास घराजवळ अवघ्या सहाशे फूटावर असलेली कांद्याची वखार अज्ञात इसमाने पेटवून दिल्याने जगताप यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या विकृतीचा कासुर्डी कामठवाडी परीसरातील शेतकऱ्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंडल अधिकारी दिपक कोकरे, कृषी सहायक अधिकारी स्नेहल थेऊरकर यांच्याकडून घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

लॉकडाऊनमध्ये दूध डेयरी उघडण्यास परवानगी द्या – दूध डेयरी मालकांची जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे मागणी

डीआरडीओमध्ये ७९ पदांवर संधी

 

lead story