अपक्ष उमेदवाराच्या तक्रारीमुळे अंधेरी पोटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता?

शिवसेना ठाकरे गटाला जोरदार धक्का
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 28 ऑक्टोबर :- अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीत वारंवार नवनवीन ट्विस्ट येत आहेत. ही निवडणूक सुरुवातीपासून काहींना ना काही कारणावरून चर्चेत राहिली आहे. मूळ शिवसेना दुभंगल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक !

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना ठाकरे गटातर्फे अधिकृत उमेदवारी देण्यात आली. परंतु लटके यांचा महानगरपालिकेच्या नोकरीचा राजीनामा स्वीकृत न झाल्याने त्यांना कोर्टाचे दार ठोठावावे लागले. तिथे ऋतुजा लटके यांच्या बाजूने निर्णय झाल्यावर त्यांनी फॉर्म भरला. त्यांनतर पुन्हा घडामोडी होवून भाजपने तेथील आपले उमेदवार मुरजी पटेल यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही निवडणूक सोपी झाली असे वाटले.

ही निवडणूक अजून बिनविरोध करावी म्हणून अंतिम यादीतील काही उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचे एका अपक्ष उमेदवाराने सांगितले. त्याप्रमाणे आपल्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव व धमकी येत असल्याची तक्रार या अपक्ष उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे केली. निवडणूक आयोगाने ही तक्रार दाखल करून चौकशी करण्याचे आश्वासन अपक्ष उमेदवाराला दिले आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवाराने केलेल्या तक्रारी प्रमाणे जर काही तथ्य असेल तर ही निवडणूक रद्द होऊ शकते असे राजकीय तज्ञांचे मत आहे.

हे पण वाचा :-

andherielection