ग्राम बेलाड येथे शाळेत जात असतांना रस्त्यावरील विहिरीत पडून बारा वर्षीय विद्यार्थिनी चा मृत्यू
बुलढाणा दि १२ फेब्रुवारी :- – जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील ग्राम बेलाड येथील ईयत्ता सहावीत शिकणाऱ्या कु.दिव्या गोविंदा संबारे या बारा वर्षीय मुलीचा शाळेत जात असताना रस्त्यांवरील विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विहिरीला कठडे नसल्याने त्या मुलीचा त्या विहिरीत तोल गेला त्यामुळे ती विहिरीत पडली .
आधीच कोरोना मुले मुल पाठविण्यासाठी मायबाप धजावत नव्हते आणि शाळा सुरु झाल्यानतर लहान मुलांचा आग्रह शाळेत जाण्यासाठी आज शेवटचा कु .दिव्याचा दिवस ठरला आहे
बेलाड येथील कु.दिव्या गोविंदा संबारे वय 12 ही ग्रामीण विकास विद्यालयात इयत्ता सहाव्या वर्गात शिकत होती आज शाळेत जाण्यासाठी ती निघाली असता रस्त्यावरील विहिरीत पडल्याने तिचा मृत्यू झाला .त्यामुळे गावात एकच वार्ता पसरली आणि संपूर्ण गावच शोकमग्न झाले . आणि त्याची तक्रार पोलीस विभागात दिली असून अधिक तपास सुरु आहे .