संतापजनक! पाच वर्षीय चिमुकलीवर ५० वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार

आरोपी फरार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : उमरखेड शहरातील साणकवाडी येथील एका ५० वर्षीय नराधमाने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. सदर अत्याचार एका व्हिडिओ क्लिप मुळे उघडकीस आला. आरोपी शेख नजीर शेख उस्मान दौला हा सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दिनांक ८ मे रोजी पाच वर्षीय पीडित मुलगी ही दूध आणण्याकरिता आरोपीच्या कोठ्यामध्ये गेली होती. दरम्यान आरोपी नामे शेख नजीर शेख उस्मान दौला (५०) याने मुलीसोबत गैरवर्तन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

काही दिवसानंतर एका व्हिडीओ क्लिप मुळे हा प्रकार उघडकीस आला. सदर क्लिप बघून पीडित मुलीच्या आईवडिलांनी पोलीस स्टेशनला धाव घेत हकीकत सांगितली. सदर फिर्यादीचा रिपोर्ट वरून ताबडतोब गुन्हा नोंद करून पोलीस आरोपीच्या घरी गेले असता आरोपी हा फरार झाला होता. आरोपींविरुद्ध ३७६ अ ब भादंवी सह ४, ८ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हा फरार आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

हे देखील वाचा : 

कोल्हापूर महानगरपालिकेत ८५ वैद्यकीय जागांसाठी भरती

रत्नागिरीतल्या काळबादेवीत आढळला पांढरा कावळा

 

lead storyYawatmal