धान खरेदी अपहार प्रकरणात आणखी एका आरोपीतास अटक

आरोपीतांची संख्या झाली 03, विपनन निरीक्षकास दिनांक 15 जून 2024 पर्यंत पोलीस कोठडी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 8 जुन- गडचिरोली जिल्ह्रातील उपप्रादेशिक कार्यालय, घोट अंतर्गत मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम 2022-2023 या दरम्यान झालेल्या अपहार प्रकरणात यापुर्वी दोन आरोपीतांना अटक करण्यात आली असुन त्यांना दिनांक 15/06/2024 पावेतो पोलीस कोठडी मिळालेली आहे.

सदर गुन्ह्राचे तपासात दिनांक 06/06/2024 रोजी राकेश सहदेव मडावी, वय 34 वर्षे, व्यवसाय – नोकरी (प्रतवारीकार तथा विपनन निरीक्षक आदिवासी विकास महामंडळ, घोट) यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याचा गुन्ह्रातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास दिनांक 06/06/2024 रोजी अटक करुन दिनांक 07/06/2024 रोजी मा. न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग न्यायालय, चामोर्शी येथे हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यास दिनांक 15/06/2024 पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरचे प्रकरण धान खरेदी घोटाळ्याशी संबंधित असल्याने आणखी काही आरोपीतांचा सहभाग असल्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे नेतृत्वात  राहुल आव्हाड, सरीता मरकाम, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.
https://youtu.be/iRyHbaNc7Ak