जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे त्रुटींची पुर्तता करण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर दि. 6 जुलै : चंद्रपूर जिल्हयात माहे जानेवारी 2021 मध्ये पार पडलेल्या निवडणूकीमध्ये निवडून आलेल्या ज्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्राकरीता आपले अर्ज पडताळणी समितीकडे सादर केले आहेत, परंतु अजूनपर्यंत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही किंवा त्रुटींबाबत एस.एम.एस अथवा पत्र प्राप्त झाले नाही, अशा उमेदवारांनी तात्काळ आपल्या प्रकरणांच्या चौकशीविषयी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर या कार्यालयाशी प्रत्यक्षपणे संपर्क साधावा.

तसेच, जे उमेदवार निवडून आले आहेत. ज्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्राकरीता ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे. परंतु अजूनपर्यंत ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे जोडून या कार्यालयास सादर केले नाही, अशा उमेदवारांनी ऑनलाईन स्वरुपात भरलेले फॉर्म त्वरीत या कार्यालयास सादर करावे, असे आवाहन, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त व्ही. एम. वाकूलकर यांनी केले आहे.

हे देखील वाचा :

मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

पावसाळी अधिवेशनात जनहिताचे निर्णय घेतल्याचे समाधान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

 

lead story. cast validity