सोशल मीडियावरून मदतीचे केले आवाहन आणि उभा राहिला ‘त्या’ निराधार आजीसाठी निवारा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी – के. सचिनकुमार

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील नायगाव येथील एका निराधार व वयोवृद्ध आजींच्या निवाऱ्यासाठी प्रवाह परिवाराचे संस्थापक रामेश्वर गोर्डे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून आजीच्या निवाऱ्यासाठी मदतीचे आवाहन केले. या मदतीच्या आव्हानाला लोकांनी चांगला प्रतिसाद देत आजीसाठी 17 हजार 702 रुपये मदत ही जमा झाली. त्याच मदतीच्या जोरावर नायगाव येथील या आजींच्या निवाऱ्यासह जीवनावश्यक वस्तूंचा देखिल प्रश्न मार्गी लागला.

10 फुट लांब व 7 फुट रूंदीच्या पञ्याच्या शेड सह ताट, पक्कड, प्लेट, वाट्या, कढई, पातेल, पोळपाट, बेलणे, तवा, ग्लास, पातेलं,  झाडू, खराटा, कुलुप, सुपली, गाळणी, ब्रश, दुरडी, आरसा, कंगवा, सांडपाण्यासाठी 300 लिटरचा ड्रम, पिण्याच्या पाण्यासाठी 60 लिटरचा ड्रम, आजींना चप्पल, गादी, ऊशी,  50 किलो गहू,  25  किलो तांदूळ, 5 किलो साखर, अंगाच्या साबनी, कपड्यांच्या साबनी, घासणी या जीवनावश्यक वस्तूंसोबतच दोन चांगल्या नाट्या व पिस आजींना दिले.

हे सर्व काम पुर्ण झाल्यानंतर आजींचा आनंद गगनात मावणार नव्हता. एवढं सगळं साहीत्य दिल्यानंतर आजी तर भारावून गेल्या. खरचं हे काम करत असतांनी 5-6 दिवस खुप वेगळा आनंद मिळाला. हे सर्व काम आपल्या सर्वांच्या सहकार्याने शक्य झाले आहे. आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून जी भरभरुन 17702 रूपयांची मदत केली. याच मदतीच्या जोरावर हे सर्व शक्य झाले आहे. असे रामेश्वर गोर्डे यांनी सांगितले.

हे देखील वाचा  :

अहेरीत जावयाने केली सासऱ्याची गोळी झाडून हत्या

आत्मसमर्पितांसाठी असलेल्या नवजीवन वसाहत येथील कार्यक्रमाप्रसंगी एका जहाल महीला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण

२६ जूनच्या चक्काजाम व जेलभरो आंदोलनात ओबीसींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – ओबीसी नेते रमेश भुरसे यांचे आवाहन

 

 

 

Aurangabadlead story