साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करावे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर, 25 नोव्हेंबर :-  महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील नातंग समाज व त्यातील 12 पोटजाती मांग, मातंग, मिनीमादग मांग मांगमहाशी, मदारी, राधेमांग, मांग गारोडी, मादगी, मादिगा या पोटजातीतील 18 ते 50 या वयोगटातील दारिद्रय रेषेखालील (वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 300000/- पर्यंत) बेरोजगारांकरिता साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्जयोजना राबविण्यात येतात. शासन निर्णय क्र. एलएएस 2022/प्र.क्र.94/महामंडळे, दि. 4 नोव्हेंबर 2022 अन्वये रु. एक लाख प्रकल्प मर्यादेची थेट कर्ज योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पालघर जिल्हयाकरिता 5 चे भौतिक उदिदष्ट (50 % पुरुष व 50% महिला) देण्यात आलेले आहे. यामध्ये ग्रामीण भागासाठी प्राधान्य राहील. तसेच राज्यस्तरावरील क्रिडा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना तसेच सैन्य दलातील वीरगती प्राप्त वारसापैकी एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यात येईल.

थेट कर्ज योजनेचे अर्ज जिल्हा कार्यालयात दि. 28 नोव्हेंबर 2022 पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. सदर कर्ज अर्जांकरिता खालील नमुद केलेल्या पात्रता व अटी, शती व निकषांची पूर्तता करणारा अर्जदार पात्र राहील. अशा अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसह कर्ज अर्ज भरणा करुन कार्यालयास सादर करण्याची अंतिम मुदत दि. 23 डिसेंबर 2022 पर्यंत राहील. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असावा, मातंग समाज व त्यातील 12 पोटजातील असावा, अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे, अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर 500 असावा, अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. 300000/- यापेक्षा जास्त नसावे, एका कुटुबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल, व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव, प्रशिक्षित असावा, महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरूप असलेली आवश्यक ती कागदपत्रे, प्रमाणपत्रे, करारपत्रे, कर्जमागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. कर्जप्रस्ताव सादर केल्यानंतर महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार मंजूरी संदर्भातील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

इच्छुक अर्जदारांनी महामंडळाच्या पालघर येथील जिल्हा कार्यालयाच्या खालील पत्त्यावर दि. 24 नोव्हेंबर 2022 ते 20 डिसेंबर 2022 या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत संपर्क साधावा. जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ , आफरीन अपार्टमेंट, ए-विंग.रु.नं. 203, विक्रीकर कार्यालया शेजारी नवली रोड, पालघर पिन – 401 404 फोन नं. 022-25388413 या पत्त्यावर संपर्क साधावा.

हे देखील वाचा :-

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

विद्यापीठांनी आत्मनिर्भरतेचा संकल्प करावा – राज्यपाल भगत सिंग कोश्यारी

Annabhau Sathe Corporationdirect loan schemepalghar