संदिप कोरेत यांची भारतीय जनता पार्टी अहेरी विधानसभा क्षेत्र प्रभारी पदी नियुक्ति

विनोद आकनपल्लीवार यांची भारतीय जनता पार्टी अहेरी तालुका प्रभारी पदावर नियुक्ती
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 6 मार्च :- भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा च्या वतीने देसाईगंज/वडसा येथे रविवार ५ मार्च रोजी शक्तीकेंद्र प्रमुख व शक्तीकेंद्र विस्तारक अभ्यासवर्ग आयोजन करण्यात आले होते. या अभ्यासवर्गा मध्ये आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी बुथस्तरावर बुथसमिती कशाप्रकारे करायचे आहे त्याचे प्रशिक्षण देण्यात आले. याच अभ्यासवर्ग बैठकीमध्ये अहेरी विधानसभामधील पाचही तालुक्यांत पक्ष संघटन कार्यासाठी स्वतःला वाहून नेऊन पक्ष मजबूत केल्याबद्दल विधानसभा क्षेत्र प्रभारी म्हणून आदिवासी आघाडी चे प्रदेश सदस्य तथा जिल्हा कार्यकारी अध्यक्ष संदिप कोरेत व अहेरी तालुका प्रभारी म्हणून आलापल्ली ग्रामपंचायत चे उपसरपंच विनोद आकनपल्लीवार यांची नियुक्ती भाजप जिल्हा अध्यक्ष किशन नागदेवे, व जिल्हा महामंत्री गोवींद सारडा यांनी घोषणा केली.

हे पण वाचा :-