परभणीत मोठ्या सरकारी पदांवर महिलांची नियुक्ती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

परभणी, 22 ऑक्टोबर :- एकीकडे अनेक मोठ्या पदांवर पुरूषांची मक्तेदारी असतांना परभणी जिल्ह्यात मात्र सर्व मोठ्या पदांवर महिला राज दिसून येत आहे. गुरूवारी परभणीच्या पोलीस अधीक्षक पदी आर. रागसुधा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यापासून परभणीत तीन मोठ्या पदांवर महिला अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गुरूवारी गृह मंत्रालयाने 42 आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या जाहीर केल्या. त्यात रागसुधा यांची परभणीच्या पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. रागसुधा या 2015 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून याआधीही त्यांनी परभणीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पद संभाळले आहे. नुकतीच त्यांची पुन्हा परभणीत बदली झाली असून त्याआधी त्या जालन्यातील राज्य राखीव पोलीस दलात कमांडंट पदावर होत्या.

परभणीत राज्यसभा खासदार व आमदार देखील महिला आहेत. तसेच परभणीच्या जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त व जिला सचिव तसेच सत्र न्यायालयातील न्यायमुर्ती ही महिला आहेत. परभणी महापालिकेत तृप्ती सांडभोर यांची 1 सप्टेंबर रोजी आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. तर परभणी जिला परिषदेच्या अतिरिक्त सीईओ पदी रश्मी खांडेकर आहेत. परभणीच्या जिल्हाधिकारी या 2014 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आंचल गोयल आहेत तर उज्वला नांदेश्वर या जिल्ह्याच्या सत्र न्यायालयाच्या न्यायमुर्ती आहेत. परभणीच्या डॉ. फौजिया खान या राज्यसभेवर खासदार असून परभणीतील जिंतूर मतदारसंघाच्या आमदार या मेघना बोर्डिकर आहेत.

हे पण वाचा :-

साॅफ्टवेअर इंजिनिअर आदिवासी महिला वर सामुहिक बलात्कार

अपहरण व मारहाण प्रकरणी आव्हाडांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

 

Appointmentgovernmentin Parbhaniof womenpositionsto senior