लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १० नोव्हेंबर : राज्यातील महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्यासाठी वर्षभरापासून प्राध्यापक संघटना मागणी करत होत्या. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांच्या पहिल्या टप्यातील भरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
पहिल्या टप्यात २०८८ प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावे यासाठी मागील काही वर्षांपासून प्राध्यापक संघटना मागणी करत होत्या. अनेकदा प्राध्यापक भरती व्हावी यासाठी संघटनांकडून आंदोलने देखील करण्यात आली. त्यानंतर आता टप्याटप्याने ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्राध्यापक भरती बाबत ही माहिती दिली आहे.
राज्यातील विद्यापीठे आणि अनेक महाविद्यालयांमध्ये मोठ्या संख्येने विविध विषयाची सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगानेही (UGC) वेळोवेळी सूचना याबाबत केल्या होत्या. मात्र कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पदभरतीची प्रक्रियाही लांबणीवर पडली होती. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी मान्यता मिळाल्याने आता कोरोच्या दुसऱ्या लाटे नंतर पद भरती होणार आहे.
हे देखील वाचा :
मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? देवेंद्र फडणवीसांचा सवाल